दसरा मेळाव्यासाठी गेला तो परतलाच नाही; रायगडमधील शिंदे समर्थक बेपत्ता?

By Raigad Times    07-Oct-2022
Total Views |
poladpur wonted
 
पोलादपुर । शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेला पोलादपुर येथील समर्थक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गणेश असे त्याचे नाव असून गेले दोन दिवस त्याचा शोध सुरु आहे.
 
पोलादपूर तालुक्यातील कापडे गावचे रहिवासी असलेला गणेश सुंदर सकपाळ हा दसर्‍याच्या दिवशी ते बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी गेला होता. शिंदे गटाकडून आरक्षित करण्यात आलेल्या एसटी बसने त्यांनी मुंबई गाठली होती. मेळावा संपल्यानंतर त्यांच्या साथीदारांनी गणेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र तो सापडाला नाही.
 
यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ते घरी परतले नाहीत. तसेच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. या संदर्भात आमदार भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. गणेश सकपाळ यांचा आपण त्याचा शोध घेत असल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले.
 
शिवाजी पार्कमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणं झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. बीकेसीतील मेळाव्यानंतर आता ही वेगळीच माहिती समोर आली आहे.