रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणारे पाचजण अटकेत

By Raigad Times    07-Oct-2022
Total Views |
wild meat
 
कर्जत| कर्जतजवळील साळोखवाडी येथे रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणार्‍यांवर वनविभागाने कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून मांस तसेच चार कोयते,तराजू काटा हे साहित्य जप्त केले आहे.
 
कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ४ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हुमगाव, मौजे साळोखवाडी येथील रहिवासी मारुती पवार यांच्या घरासमोर असलेल्या बकर्‍यांच्या बेड्यावर धाड टाकण्यात आली.
 
यावेळी आरोपी दशरथ बाळू वाघमारे, शरद रघुनाथ वाघमारे, सोमनाथ पप्पू पवार, साळोखवाडी, दिपक लहानू पवार (सर्व आरोपी राहणार मौजे साळोखवाडी) यांनी रानडुकराची शिकार करून त्याच्या अवयवाचे व मांसाच्या विक्रीसाठी कोयत्याने तुकडे करीत असताना आढळून आले. त्यांनी वनकर्मचार्‍यांना पाहून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र वन कर्मचार्‍यांनी दशरथ बाळू वाघमारे यांना ताब्यात घेतले. त्याच्या जबानीवरुन रविंद्र मुका वाघमारे, राहणार डोनेवाडी यास अटक करण्यात आले. तसेच वनकर्मचार्‍यांनी संबंधित ठिकाणावरुन रानडुकराचे ३९.१२० किलोग्राम मांस व अवयव हस्तगत केले.
 
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दशरथ बाळू वाघमारे, रविंद्र मुका वाघमारे यांची ५ ऑक्टोबर २०२२ रोजी चौकशी केली असता त्यांनी शरद रघुनाथ वाघमारे, रा.साळोखवाडी व दिपक लहानू पवार, रा.साळोखवाडी यांची माहिती दिल्याने या दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. गजानन मारुती पवार याच्यासह अन्य तीघांना अटक केली.
 
अटक केलेल्या चौघांनाही प्रथम वर्ग न्यायालय, कर्जत येथे हजर करण्यात आले असून न्यायालयाने या प्रकरणी एकूण पाच जणांना ६ दिवसाची वन कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणाचा कर्जत (पूर्व) वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण हे अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व पनवेल सहाय्यक वनसंरक्षक एस.एन.वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.