पालीत माजलेल्या बैलाची दहशत; तीन नागरिकांवर केला हल्ला

By Raigad Times    06-Oct-2022
Total Views |
bull attack 
 
सुधागड -पाली | पालीत एका पिसाळलेल्या बैलाने दहशत माजवली होती. त्याने तीन नागरिकांवर हल्ला देखील चढवला होता. शर्तीच्या प्रयत्नांनी बुधवारी सायंकाळी अखेर या बैलाला जेरबंद करण्यात यश आले.
 
बैलाला पकडण्यासाठी नगरपंचायत पाली, शिवऋण प्रतिष्ठान, रेस्क्यू टीम पुणे व शिवदुर्ग प्रतिष्ठान लोणावळा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 
 संध्याकाळी पाच वाजता रेस्क्यू टीम पालीत दाखल झाली. बैलाला गुंगीचे औषध देऊ त्याला पकडण्यात आले आहे. अशी माहिती पाली नगरपंचायत स्वच्छता व आरोग्य सभापती विनायक जाधव यांनी दिली.
 
 या बैलाला पुणे रेस्क्यू केंद्र येथे नेण्यात आले आहे. सदरील बैलाला विलगिकरण (आयसोलेट) करतील. त्यानंतर नक्की रेबीज आहे की नाही हे तपासले जाईल.
केतन म्हसके, उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान