दोन महिलांनी मटण व्यापार्‍याची ४ लाख रोख रकमेची पिशवी केली लंपास

By Raigad Times    04-Oct-2022
Total Views |
Robber
 
पनवेल  |  मटण व्यापार्‍याची ४ लाख रोख रकमेची पिशवी लंपास करून भरदिवसा दोन महिलांनी लुट्न पलायन केले. ही घटना खारघर वसाहतीमधील सेक्टर ३९ येथील परिसरात पापडीचा पाडानजीक बौद्ध स्मशानभूमीजवळील मार्गावर घटना घडली आहे.
मटण विक्रेते मेहमूद शेख यांचा व्यवसाय खारघरमध्ये आहे. अनेक मटण विक्रेत्यांकडून त्यांचे मटण विक्रीचे पैसे गोळा करण्याचे काम ते रिक्षातून फिरून करतात. पापडीचा पाडा येथील स्मशानभूमीजवळ शेख यांनी लघुशंकेसाठी रिक्षा उभी केल्यावर शेख यांच्याकडे ४ लाख ८ हजार रुपयांची रोख रक्कम होती.
 
मात्र लघुशंकेसाठी आडोशाला उभे असताना त्यांच्याजवळ दोन महिला आल्या. त्यातील एक महिलेने बुरखा घातला होता. २५ ते ३० वयोगटांतील महिलांनी शेख यांनी येथे महिला उभ्या असताना तुम्ही लघुशंका का करताय, असा जाब विचारला. शेख यांना बोलण्यात गुंतवून त्या महिलांच्या दुकलीने शेख यांची रोकड असलेली निळी पिशवी घेऊन त्यांच्या तिसर्‍या साथीदारासोबत दुचाकीवरुन पलायन केले.
 
खारघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.