कालवण गावात वीज पडून घराचे नुकसान

By Raigad Times    04-Oct-2022
Total Views |
lighting in home
 
माणगाव | माणगाव तालुक्यातील कालवण गावात रमेश चंद्रकांत लाडघरे यांच्या राहते घरावर शुक्रवार दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ८:३० वा.अचानक वीज पडून घराचे प्रचंड नुकसान झाले.याची माहिती मिळताच तलाठी सजा कालवण यांनी गावात येऊन या घराचा पंचनामा केला.यावेळी पानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच रुचिता धाडवे,विभागातील जेष्ठ नेते भिकूशेठ धाडवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
रमेश लाडघरे यांचे कालवण गावातील राहते घर क्रमांक ४५ या घरावर शुक्रवारी रात्री अचानक वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाले.त्यामध्ये घराची कौले,सागवानी भाले,इलेट्रीक फिटिंग,ढापे,भिंतीला तडे असे जवळपास ९६ हजार ३७५ रुपयांचे नुकसान होऊन तास पंचनामा तलाठी सजा कालवण यांनी ग्रामस्थांना समक्ष केले.या घरमालकाला शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच रुचिता धाडवे व जेष्ठ नेते भिकूशेठ धाडवे यांनी केली आहे.