मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या पालीच्या बल्लाळेश्वराचे घेणार दर्शन

By Raigad Times    03-Oct-2022
Total Views |
Raj T
 
अलिबाग । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत.
 
विदर्भ, पुणे नंतर उद्या मंगळवार दि. 4 ऑक्टोबर रोजी पाली येथे येणार आहेत. सकाळा 9 वाजता ते बल्लाळेश्वराचे दर्शन घेणार असल्याची माहिती रायगड जिल्हा संघटन गोवर्धन पोलसानी यांनी दिली आहे.
 
महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. 15 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी विदर्भ दौरा केला. यानंतर दोन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौरा केला. नाशिकला येण्यापूर्वी शनिवारी राज यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर ( 2 ऑक्टोंबर ) राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह वणी येथील आदिशक्ती सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन घेतले.
 
उद्या ते पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेणार आहेत. तर दसर्‍याला ते पुणे येथे असणार आहेत.