कर्जत | कर्जत तालुक्यातील सर्व भागात भाताची शेटे पिकांनी डोहरली आहेत.मात्र त्या पिकाचे सध्या सुरु असललेला सरता पाऊस नुकसान करीत आहे, त्यामुले बळीराजा चिंतेत आहे. असे असताना आता शेतकर्यांना जन्गलातील रानडुकरे यांचा त्रास भाताचे पीक हातातून जाणार काय? अशी स्थिती निर्माण करून राहिला आहे.
कर्जत तालुक्यातील वदप, कुशिवली हा परिसर डोंगराच्या कडेने लागलेला भाग असून या भागात शेती करणारे शेतकरी यांच्या शेतात भाताचे चांगले पीक आले आहे. त्यामुळे शेतकरी खुश आहे, मात्र सरता पाऊस आणि त्यासोबत रानडुक्कर यांचा प्रादुर्भाव शेतकर्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. रानडुकरे हि भाताच्या शेतात घुसून भाताच्या पिकाचे नुस्कान करीत आहेत. त्यामुळे वदप, कुशिवली आणि दहिगाव भागात रानडुकरे यांचा हैदोस सुरु असून कळपाने येणारी रानडुकरे यांच्यामुळे भाताचे शेतात पीक शेतात अस्ताव्यस्त पणे कोसळून जात आहे. आधीच अवकाली पाऊस त्यातच हातातोंडाशी आलेला घास डुकरांनमुळे निघुन जाण्याची वेळ शेतकर्यांवर आलेली आहे मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने पिकाना त्याचबरोबर जीवितालाही धोका होत आहे वन विभागाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे तसे निवेदन तहसिलदार आणि वन अधिकारी यांना स्थानिक शेतकरी देणार आहेत. दरवर्षी भाताच्या पिकाला रानडुकरे यांचा त्रास होत असतो.

तहसील कार्यालय आणि वन विभाग यांनी सततचा निर्माण होणार प्रश्न समजून घेऊन भाताची पिकाची नासाडी थांबविली पाहिजे. त्यास्तही आमच्या विभागाकडून पत्रव्यवहार यापूर्वी करण्यात आला असून पुन्हा एकदा कळविले जाईल. आम्ही भाताचे प्रयोग शेतीत करीत असतो आणि त्यावेळी रानडुकरे त्या शेतात घुसुन सर्व मेहनत फुकट घालवतात तसेच शेतकर्यांचे आणि कृषी विभागाचे नुकसान करतात.
अजित पाटील- समन्वयक तालुका कृषी अधिकारी