पेणचे पत्रकार देवा पेरवी यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर

By Raigad Times    08-Jan-2022
Total Views |
deva peravi
 
 
पेण | नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार दै.रायगड टाइम्सचे पेण प्रतिनिधी देवा पेरवी यांना जाहीर करण्यात आला आहे. खासदार सुनिल तटकरे व दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता नागोठणे येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
 
पत्रकार असोसिएशनतर्फे नागोठणे शहर व ग्रामीण विभागात गेली नऊ वर्षे सातत्याने समाजकार्य करण्यात येत आहे. त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. यंदाचा रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष, जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असणारे पेणचे पत्रकार देवा पेरवी यांना तर कै.तात्यासाहेब टके जेष्ठ पत्रकार पुरस्कार मुंबई येथील रवींद्र महिमकर यांना आणि युवा पत्रकार पुरस्कार खेड-रत्नागिरी येथील चंद्रकांत बनकर यांना जाहीर करण्यात आले आहे. रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता नागोठणे येथील श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
 
 
यावेळी रायगडचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, किशोर जैन, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे असोसिएशनचे संस्थापक श्यामकांत नेरपगार, अध्यक्ष ऍड.महेश पवार, उपाध्यक्ष धम्मशील सावंत यांनी बोलताना सांगितले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.