रायगडात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाला सुरुवात

03 Jan 2022 13:25:39
Vaccination 
 
अलिबाग : रायगडात आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. अलिबाग शहरातील डोंगर हॉल येथील केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत अनुज जितू शिगवण या लाभार्थ्याला पहिली लस देऊन लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.
 
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई महानगर क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज, 3 जानेवारीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.
 
जिल्ह्यातील 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचेही कोरोनापासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.
------------------------------------------
24 केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध
पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय (अलिबाग, चौक, जेएनपीटी/उरण, कर्जत, कशेळे, खोपोली, महाड, म्हसळा, माणगाव, मुरुड, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन) अशी 14 आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका क्षेत्रातील 10 नागरी आरोग्य केंद्रे येथील लसीकरण केंद्रांवर ही लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
------------------------------------------
कोविन संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा
लसीकरणासाठी जिल्ह्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलामुलींची अंदाजित संख्या 1 लाख 45 हजार 383 इतकी आहे. या सर्वांना को-वॅक्सिन लस देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी कोविन संकेतस्थळावर दि.1 जानेवारी 2022 पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
------------------------------------------
* 15 ते 18 वर्षे वयोगटातील नवीन लाभार्थींसाठी सूचना :
Powered By Sangraha 9.0