नेरळमध्ये रायगड जिल्ह्यातील पहिले स्कील हब सुरु

03 Jan 2022 14:42:48
skil hub1
 
कर्जत (संतोष पेरणे)| देशभरातील आठ लाख युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ५००० स्कील हब उभारले जात आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिले स्कील हब नेरळ येथे उभारण्यात येत असून त्याची सुरुवात रायगड जनशिक्षण संस्थानने पुढाकार घेऊन केली आहे.

skil hub2
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात जनशिक्षण संस्था काम करीत आहे. रायगड या योजनेत कार्य करत असणार्या नेरळ-कर्जत येथे जनशिक्षण संस्थान रायगड आणि करिअर टेक्नीकल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्कील हब’साठी पुढाकार घेण्यात आला आहे.
 
skil hub3
 
नेरळ कर्जत येथे कौशल्य विकास मंत्रालयाचे स्कील हब योजनेतील जिल्ह्यातील पहिले सेंटर सुरु करण्यात आले. असिस्टंट इलेक्ट्रिशियन आणि फिल्ड इंजिनीअर आरएसीव्ही प्रशिक्षण वर्गाचे सुरु करण्यात आले. सदर योजनेत देशभरात ५ हजार स्कील हबच्या माध्यमातून ८ लाख युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 
jahirat
 
नेरळ येथील सदर प्रशिक्षणवर्गाच्या उद्घाटनाला इलेक्ट्रिशिअन आणि एसी, फ्रिज व वॉशिंग मशीन रिपेरिंगवर सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक गणेश भोपी आणि विजय रणदिवे यांनी केले. त्यावेळी जनकल्याण संस्थानच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी आणि व्यवस्थापक मंडळ यांची उपस्थिती होती. या संस्थेच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कार्यक्रम राबवित आहे.
 
 
उद्घाटनप्रसंगी डॉ.सोमय्या यांच्यासह संचालक विजय कोकणे, अन्वया करंदीकर, कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता मनवे, कौशल्य विकासचे राज्य प्रतिनिधी संजय वर्तक, कौशल्य विकासचे जिल्हा प्रतिनिधी सायली सुभाने, रोजगार समन्वयक नवीन भोपी, रंजना नवीन भोपी, गणेश्री भोपी, असिस्टंट इलेक्ट्रिशिअन प्रशिक्षक गणेश भोपी, फिल्ड इंजिनिअर प्रशिक्षक विजय रणदिवे, बरंच पोस्ट मास्तर अविनाश डायरे आणि दिनेश कांबरी आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0