पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार प्रभागांसाठी 17 उमेदवारी अर्ज

03 Jan 2022 18:35:01
poladpur 3
 
 
पोलादपूर (शैलेश पालकर)|  नगरपंचायत पोलादपूरच्या पहिल्या टप्प्यातील 13 प्रभागांच्या मतदानानंतर दुसऱ्या टप्प्यातील चार प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षांसोबतच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत अटळ झाली आहे.
 
 
poladpur 2 
 
 
प्रभाग 2 मध्ये कल्पेश सुखलाल मोहिते (काँग्रेस), मनोज प्रजापती (शिवसेना), संभाजी शिवाजी माने (भाजपा) तर काँग्रेसकडून अमित संतोष भुवड आणि शिवसेनेकडून साहिल मधुकर जाधव यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 8 मध्ये सोनाली प्रकाश गायकवाड (शिवसेना), अनिता राजन जांभळेकर (काँग्रेस), धुमाळ रचना राजन (भाजपा) तर काँग्रेसकडून समिधा संतोष महाडीक यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रभाग 10 मध्ये शुभांगी संतोष चव्हाण (काँग्रेस), प्रतिक नंदकुमार सुर्वे (भाजप), प्रसाद राजन इंगवले (शिवसेना) तर काँग्रेसकडून अमित संतोष भुवड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रभाग 14 मध्ये भाजपच्या अंकिता अरविंद जांभळेकर (भाजपा), प्रतिक्षा प्रसाद भूतकर (काँग्रेस), प्राची निलेश सुतार (शिवसेना) आणि काँग्रेसकडून समिधा संतोष महाडीक यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

poladpur 3 
 
 
आज मंगळवार, दि. 4 जानेवारी 2022 रोजी छाननी आणि वैध ठरलेल्या अर्जांची यादी सकाळी 11 वाजल्यापासून प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी दि. 10 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असून दि.18 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया घेण्यात येणार आहे.

jahirat 
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेकडून आ.भरत गोगावले आणि राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून काँग्रेसनेते हनुमंत जगताप, उपसभापती शैलेश सलागरे, माजी सभापती दिलीप भागवत तसेच भाजपकडून जिल्हानेते बिपीनदादा महामूणकर, तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, जिल्हा सरचिटणीस राजन धुमाळ, शहर अध्यक्ष राजाभाऊ दिक्षित तसेच महिला आघाडी संघटिका माई तथा उज्ज्वला मराठे शेठ आदींनी उपस्थिती दर्शविली.
Powered By Sangraha 9.0