पाली नगरपंचायत निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादीची बाजी

17 पैकी 10 जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी

By Raigad Times    19-Jan-2022
Total Views |
Pali Nagar Panchayat Election Raigad
 
पाली/बेणसे (धम्मशील सावंत) अष्टविनायक तीर्थक्षेत्र व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. 17 पैकी 10 जागांवर शेकाप-राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत.
 
आज (19 जानेवारी) पाली तहसील कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर होऊन, शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या हाती नगरपंचायतीची सूत्रे आली आहेत. यामध्ये शेकापच्या उमेदवार प्रणाली सूरज शेळके या सर्वाधिक 236 मतांनी आघाडीवर राहिल्या. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर मारुती भालेराव हे एक मताने निवडून आले आहेत.

Pali Nagar Panchayat Election Raigad 
अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक असल्याने ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत शिवसेना व भाजप वेगवेगळे लढत होते. तर राष्ट्रवादी व शेकाप यांनी आघाडी करुन निवडणूक लढवली. विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी या निवडणुकीत कमी अधिक प्रमाणात यश मिळवले आहे. शिवाय एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

Pali Nagar Panchayat Election Raigad 
एकूण 17 जागांसाठी तब्बल 60 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदान केंद्रावर जमले होते. कोणत्या उमेदवाराला किती मते पडतील? कोण किती मताने जिंकेल? याचीच आकडेवारी व चर्चा निकाल लागेपर्यंत सुरू होती. सर्वसामान्य नागरिकही निकालाच्या प्रतीक्षेत होते. अखेर निकाल जाहीर ‘कही खुशी कही गम’ दिसून आले.

Pali Nagar Panchayat Election Raigad
 
-------------------------------
17 प्रभागातील पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे :-
राष्ट्रवादी काँग्रेस - 6
शेकाप - 4
शिवसेना - 4
भाजप - 2
अपक्ष - 1
-------------------------------

Pali Nagar Panchayat Election Raigad 
विजयी उमेदवार खालीलप्रमाणे :
प्रभाग 1 : जुईली श्रीकांत ठोंबरे (भाजप)
प्रभाग 2 : कल्याणी संदीप दपके (शिवसेना)
प्रभाग 3 : दिप्ती विठोबा पारधी (शिवसेना)
प्रभाग 4 : आरिफ गफूर मणियार (शेकाप)
प्रभाग 5 : आशिक गफूर मणियार (राष्ट्रवादी)
प्रभाग 6 : सुलतान शरीफ बेनसेकर (राष्ट्रवादी)
प्रभाग 7 : गणेश प्रभाकर सावंत (भाजप)
प्रभाग 8 : पराग विजय मेहता (अपक्ष)
प्रभाग 9 : सचिन सुधाकर जवके (शिवसेना)
प्रभाग 10 : गीता प्रकाश पालरेचा (राष्ट्रवादी)
प्रभाग 11 : मधुरा सखाराम टाकळेकर (राष्ट्रवादी)
प्रभाग 12 : नलिनी गणेश म्हात्रे (राष्ट्रवादी)
प्रभाग 13 : विनायक विठ्ठल जाधव (शेकाप)
प्रभाग 14 : प्रणाली सूरज शेळके (शेकाप)
प्रभाग 15 : प्रतीक्षा सुबोध पालांडे (शिवसेना)
प्रभाग 16 : प्रीतिजा नथुराम जोशी (शेकाप)
प्रभाग 17 : सुधीर मारुती भालेराव (राष्ट्रवादी)

Pali Nagar Panchayat Election Raigad