खवले मांजर व डुकराच्या सुळ्याची अवैध विक्री करणारे चारजण अटकेत

14 Jan 2022 15:20:46
khavle maanjar
 
अलिबाग । खवले मांजर आणि डुकराच्या सुळ्याची विक्रि करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाचजणांना रोहा वनविभागांतर्गत महाड वनपरिक्षेत्रातील मौजे टोळ बुद्रुक, महाड येथे वनक्षेत्रपाल भोर, वनक्षेत्रपाल महाड व कर्मचारी यांच्या संयुक्त टीमने ताब्यात घेतले आहे. त्याच्यांविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सुनिल भाऊ वाघमारे (रा.भेलोशी, ता. महाड) सतीश कोंडीराम साळुंखे, (रा.कुंभेशिवथर, ता.महाड) सुरज संतोष ढाणे, रा.निनामपाडळी) देविदास गणपत सुतार रा.टोळ खुर्द, शुभम प्रशांत ढाणे, रा.निनामपाडळी, ता.जि.सातारा अशी त्यांची नावे आहेत.
 
 
मौजे टोळ बुद्रुक, महाड येथे सापळा रचून अवैधरित्या विक्री करीत असताना जिवंत खवले मांजर-1, रानडुक्कर सुळा-1, व संशयित पावडर एकूण तीन मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपासाची कार्यवाही सुरु असल्याची माहिती रोहा वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री.अप्पासाहेब निकत यांनी दिली आहे.
 
Powered By Sangraha 9.0