अ‍ॅड. उमेश ठाकूर यांच्या पोलीस कस्टडीत 17 जानेवारीपर्यंत वाढ

By Raigad Times    14-Jan-2022
Total Views |
umesh thakur
 
 
अलिबाग । युवक काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. उमेश ठाकूर यांच्यासह अन्य तिघांच्या पोलीस कोठडीत 17 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. उमेशवर पेण येथील एक वकिलाची बदणामी करण्यासाठी महिलेचा वापर केल्याचा आरोप आहे.
 
अ‍ॅड. उमेश ठाकूर हे रेतीचा व्यवसाय करतात. धरमतर खाडीतील त्यांच्या अवैध रेती उत्खननासंदर्भात पेण तालुक्यातील कोलेटी येथील काशीनाथ ठाकूर वेगवेगळ्या कार्यालयात तक्रारी करत असत. त्यामुळे उमेश ठाकूर यांना व्यवसायात नुकसान होत होते. आपल्या विरोधातील तक्रारीने उमेश ठाकूर हैराण झाले होते.
 
 
त्यांनी काशीनाथ ठाकूर यांचा काटा काढण्याचा प्लान आखला. शुभम गुंजाळ यांच्या मदतीने काशीनाथ ठाकूर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले व आपल्याच ओळखीतील मनिषा चोरडेकर हिला त्यावरुन अश्लील व्हिडिओ व मेसेजेस पाठवले. या व्हिडिओ आणि मेसेजच्या आधारे मनिषा चोरडेकर हिने काशीनाथ ठाकूर यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
 
 
पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सायबर सेलची मदत घेतल्यानंतर तपासात धक्कादायक बाब समोर आली. यात उमेश ठाकूर हा या कटाचा सूत्रधार असल्याचे समोर आले.
 
 
अटकेनंतर प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याच्या मेडीकल कस्टडीत तर उर्वरीत दोघांना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.