खानाव येथे एचपीसीएल कंपनीतर्फे फिल्टर प्लांट; ग्रामस्थांना मिळणार शुद्ध पाणी

अनंत गोंधळी यांच्या हस्ते प्लांटचे लोकार्पण

By Raigad Times    13-Jan-2022
Total Views |
ALIBAG NEWS 1
 
अलिबाग | तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना स्वच्छ पाणी मिळावे व ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी रहावे, याकरिता खानाव येथे फिल्टर प्लांट बसविण्यात आला आहे. या प्लांटचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांच्या हस्ते करुन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.
ALIBAG NEWS 2 
 
खानावमधील ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळावे, याकरिता काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी एचपीसीएल कंपनीकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, खानाव येथे फिल्टर प्लांट सुरु करण्यात आला आहे. अनंत गोंधळी यांच्या हस्ते या प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कंपनीचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.