साडेसात लाखांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा

By Raigad Times    09-Sep-2021
Total Views |
crime panvel_1  
 
पनवेल | बुकिंग करता सात लाख ४४ हजार रुपये घेऊन रूम न दिल्याप्रकरणी पद्मावती बिल्डर्स आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यांच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर ३ नवीन पनवेल येथे राहणारे मन्सूर शब्बीर मुलानी हे महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेत काम करतात.
 
पद्मावती बिल्डर्स आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विकास म्हात्रे, विद्या प्रकाश सिंग व बाळकृष्ण सिनारे यांनी मन्सूर यांच्याकडून शिलोत्तर राईचुर येथील चार गुंठे मध्ये सुरू असलेल्या बालाजी मीडोस नियोजित बिल्डिंगच्या बुकिंग करता एकूण सात लाख ४४ हजार दोनशे पन्नास रुपये घेतले.
 
या प्रोजेक्टमध्ये तिघांना फक्त व्यवस्थापक म्हणून काम दिले असताना आणि त्यांना बिलकन प्रायव्हेट लिमिटेड यांनी कोणतीही बुकिंग करण्याची परमिशन दिलेली नसताना मन्सूर यांच्याकडून बुकिंग करता रक्कम घेण्यात आली. ती रक्कम परत मागितली असता मन्सूर मुलानी यांना रक्कम परत दिली नाही.