खोपोली पालिकेकडून कृत्रिम फिरते विसर्जन तलाव

09 Sep 2021 14:30:23
khopoli_1  H x
 
खोपोली | गणेशोत्सव साजरा करताना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी रोटरी क्लब आणि पालिकेने फिरते विसर्जन तलाव उपलब्ध करणार असून नागरिकांनी याचा वापर करावा, असे अवाहनही खोपोलीचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी केले आहे. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील मुख्य रहदारीचे रस्ते लक्षात घेऊन खड्डे बुजविण्याचे काम सुरू करत विविध प्रभागातील नदीकाठावरील गणेश विर्सजन घाटाची दुरूस्ती व ज्या ठिकाणी अवश्यक असेल त्याठिकाणी नदीचा धोकादायकप्रवाह पाहून संरक्षण कठडे उभारण्याचेकाम युध्दपातळीवर सुरू केले आहे.
 
खोपोली शहरात एकूण अंतर्गत ८६ किमी रस्ते आहेत, यापैकी सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे खड्डे पडले आहेत, अशा रस्त्यांची डागडुजी हाती घेतली आहे. खडी, ग्रीटचा वापर करून खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. रस्ते व गणेश विर्सजन घाटाची पाहणी मुख्याधिकारी गणेश शेटे, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, उपमुख्याधिकारी गौतम भगळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. पाताळगंगा नदीवरील गगनगिरा आश्रम, रहाटवडे सिध्दार्थनगर, मुळगांव, शिळफाटा, पुंडलिक मंदिर ताकई आदी विर्सजन घाटावर गवत झुडपे तोडून परिसर स्वच्छ करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रवाह लक्षात घेवून धोकादायक ठिकाणी नदीपात्रालगत तात्पुरते बांबूचे संरक्षण कठडे, विजेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
 
तसेच गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव मोगलवाडी, हनुमान मंदीर शिळफाटा, शंकर मंदिर तलाव वरची खोपोली याठिकाणी व्यवस्था करण्यात आली. तसेच गणेशोत्सव काळात या केलेल्या सर्व उपाय योजनांवर पोलीस प्रशासनाचे लक्ष राहणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0