पनवेल | नवीन पनवेल परिसरात चोरीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. नुकतेच बी १० मधील सर्व रहिवासी झोपलेले असताना रूमचे लॉक तोडून चोरांनी चोरी केली आहे. याची माहिती तेथील अध्यक्ष अनिल घरत व योगेश हांडगे यांनी स्थानिक नगरसेविका ऍडव्होकेट वृषाली वाघमारे यांना दिली.
नगरसेविका वाघमारे व ऍडव्होकेट जितेंद्र वाघमारे यांनी खांदेश्वर पोलिस स्टेशन येथे जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्याशी वारंवार होणार्या घरफोडी संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सखोल चर्चा केली. तसेच पोलिसांची रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्याची मागणी केली. यावेळी बी-१० सोसायटीचे अध्यक्ष अनिल घरत, योगेश हांडगे व ऍडव्होकेट जितेंद्र वाघमारे, सदानंद गावंड उपस्थित होते.