नवी मुंबई | सिडको महामंडळाच्या कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीकरिता नागरिकांच्या विनंतीस मान देऊन सदर योजनेस १ महिन्याची म्हणजेच ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोविड-१९ महासाथीच्या काळातआपल्या प्राणांची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्यांनी अविरपणे आपले कर्तव्य बजावले. या कोविड योद्ध्यांमुळे होणारी संभाव्य प्राणहानी टळली तसेच अत्यावश्यक सेवांचा नागरिकांना अविरतपणे पुरवठा होत राहिला. त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने या गृहनिर्माण या योजनेचा १५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रारंभ केला.
सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणिद्रोणागिरी या ५ नोड्समध्ये ४ हजार ४८८ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी १ हजार ८८ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (ईडब्लूएस) आणि उर्वरित ३ हार ४०० घरे सर्वसाधारणप्रवर्गाकरिता आहेत. तसेच वैधानिक तरतुदींनुसार काही घरे ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत.
इच्छुक अर्जदारांना योग्य ती कागदपत्रे जमा करण्यासाठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी संबंधितांकडून करण्यात येत होती. या बाबींचा विचार करून सिडकोने या विशेष गृहनिर्माण योजनेतील ऑनलाईन अर्ज नोंदणीसह अन्य सर्व प्रक्रियांना १ महिन्याची म्हणजेच ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन अधिकाधिक कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचार्यांनी या गृहनिर्माण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.