कळंबोलीत मनसेने घातले खड्ड्यांचे श्राद्ध

30 Sep 2021 14:16:56
KALAMBOLI_1  H
कळंबोली | कळंबोलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी कळंबोली मध्ये विविध ठिकाणी असलेल्या रस्त्यातील खड्ड्यांचे श्राद्ध घालून सिडको व महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला आहे. यावेळी मनसैनिक सह नागरिकांनीही सहभाग नोंदवून संताप व्यक्त केला. मनसेने आठ दिवसाचा अल्टिमेट सिडको प्रशासनाला देण्यात आला असून आठ दिवसात रस्त्याची स्थिती सुधारली नाही तर कळंबोली मनसे आक्रमकपणे आंदोलन उभारून सिडको प्रशासनाला जागे करतील असा इशारा शहराध्यक्ष राहुल शिरीश चव्हाण यांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.
 
कळंबोली वसाहतींमध्ये निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा यक्षप्रश्न येथील नागरिकांनाही पडत आहे .कोट्यवधी रुपये खर्च करूनही कळंबोली करांना चांगले रस्ते मिळत मिळत नाहीत. ठेकेदारांवर सिडको प्रशासनाचा वरदहस्त असल्याने ठेकेदार चांगल्या प्रकारचे काम करीत नसल्याची ओरड येथील नागरिकांकडून होत आहे .वारंवार रस्त्यांमध्ये पडणारे खड्डे हा चिंतेचा विषय असून करोडो रुपयांची बिले देऊन सुद्धा नागरिकांच्या नशिबी खड्डेमय रस्ते का येतात असा सवाल येथील नागरिक विचारीत आहेत .या गंभीर समस्येकडे नागरिकांचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कळंबोलीतील मनसेच्या मनसैनिकांनी आज अनोख्या पद्धतीचे रस्त्यात बसून खड्ड्यांचे श्राद्ध घालून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
 
KALAMBOLI 12_1  
 
या अनोख्या आंदोलनाला नागरिकांनीही उपस्थिती दर्शवून आपला पाठिंबा असल्याचे दर्शविले .या आंदोलनामध्ये राहुल चव्हाण पनवेल विधानसभा अध्यक्ष अमोल बोचरे शहर अध्यक्ष कळंबोली मनसे यांच्या नेतृत्वाखाली हे अभिनव असे आंदोलन करण्यात आले शहर उप अध्यक्ष विवेक बोराडे हे भटजींच्या भुमिकेत दिसले तसेच त्याप्रसंगी मराठी कामगार सेनेचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रशांत अनगुडे,प्रविण दळवी उप अध्यक्ष म.न .व.से, भगवान खताळ म.न.वा.से. चिटणीस, अक्षय सुतार जिल्हा अध्यक्ष रायगड चिरओ सुजित सोनवणे म.न.वा.से पनवेल तालुका चिटणीस, अनिकेत पाटील मनसे विद्यांर्थी सेना संघटक नविण पनवेल,आबाजी जावीर शहर संघटक ,राजेश शर्मा मनसे शाखा अध्यक्ष,नीलेश दाबेराव ,अतुल जाधव, रवी पवार सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0