पनवेल : वर्षा सहलीसाठी पांडवकडा धबधब्यावर आलेले १७ जण बचावले

30 Sep 2021 14:01:03
PANDHAVKADA_1  
 
पनवेल | पनवेलजवळील खारघर परिसरात असलेल्या पांडवकडा धबधब्यावर वर्षासहलीसाठी आलेले १६ ते १७ जणांना अग्नीशमन दलाच्या जवानांनी खारघर पोलिसांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले आहे.
 
शासनातर्फे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची सुचना देण्यात आली होती, असे असतानाही मुंबई व नवी मुंबई परिसरातून काही तरुण-तरुणी वर्षासहलीसाठी पांडवकडा धबधबा परिसरात आले होते. त्यात अचानकपणे मुसळधार पाऊस सुरू होवून पाण्याचा लोंढा वाढल्याने त्यांना त्या भागातून बाहेर पडणे अशक्य झाले होते. याबाबत त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला असता खारघर अग्नीशमन तसेच कळंबोली अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून त्यांनी पाण्याच्या लोेंढ्याच्या दोन्ही बाजूस शिडी लावून त्याद्वारे या नागरिकांना बाहेर काढले आहे.
 
या परिसरात कोणीही वर्षा सहलीसाठी येवू नये असे खारघर पोलिसांनी फलक लावले असतानाही बेजबाबदापणे वर्षा सहलीसाठी येणार्‍या नागरिकांमुळे अनेकांचे जीव टांगणीला लागले असतात.
Powered By Sangraha 9.0