मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन उच्च न्यायालयाने सरकारला खडसावले

By Raigad Times    22-Sep-2021
Total Views |
1st paper_1  H
 
आधी महामार्गाचे काम पूर्ण करा, मग ग्रीन फिल्ड करा !
 
मुंबई | मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दहा वर्षे उलटली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. यावरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही तोपर्यंत इतर प्रकल्पांना मंजुरी न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे प्रकल्पाच्या घोषणेनंतर याचिका दाखल करण्यात आली होती. याच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने खडसावले आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. महामार्गाचे काम रखडलेले असतानाच आता ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे या नव्या प्रकल्पाची घोषणा राज्य सरकारने केली. त्यामुळे याचिका दाखल केली गेली आहे. त्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले. या महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत दुसर्‍या विकास प्रकल्पाला परवानगी देणार नाही, असा इशाराच उच्च न्यायालयाने दिला आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला एवढी वर्षे उशीर का लागलोय, अशी विचारणा करत हे काम पूर्ण होईपर्यंत अन्य कोणत्याही विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी परवानगी देणार नसल्याचा इशारा उच्च न्यायालयाने सोमवारी (२० सप्टेंबर) राज्य सरकारला दिला.
 
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दहा वर्षे उलटली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. जनतेला आधी या प्रकल्पाचा लाभ घेऊ द्या, नंतर दुसरे प्रकल्प हाती घ्या, असे न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. त्याचवेळी मुंबई-गोवा महामार्गाचे काम किती पूर्ण झाले याचा प्रगती अहवाल देण्यासह हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही न्यायालयाने सरकारला बजावले आहे.