उरण : ट्रेलरची मोटारसायकला धडक

By Raigad Times    21-Sep-2021
Total Views |
acc_1  H x W: 0
 
ट्रेलरची मोटारसायकल स्वाराला धडक लागून कामगाराचा जागीच मृत्यू
 
जेएनपीटी | द्रोणागिरी नोड परिसरातील सि ब ड या खाजगी प्रकल्पात सेक्युटरी म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या मोटारसायकला खोपटा पुलाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार संदिप पाटील या कामगारांचा जागीच मृत्यू झाला. संदिप पाटील हा मूळचा वशेणी गावचा रहिवासी आहे. या अपघाताची माहिती मिळताच उरण पोलीस घटना स्थळावर दाखल झाले. यावेळी उरण परिसरातील नागरिकांनी, कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलरवर निर्बंध घालण्यात यावे तसेच संदिप पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी केली.
 
उरण तालुक्यात जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून कंटेनर यार्डचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामूळे या कंटेनर यार्ड मधून बंदराकडे ये-जा करणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांची रेलचेल मोठ्या संख्येने रात्री अपरात्री सुरू असते. अशा अवजड वाहनांवर नियंत्रण कोणाचेच नसल्याने होणाऱ्या अपघातात अनेक निष्पाप कामगार, तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.त्यात मंगळवारी ( दि २१ सप्टेंबर ) सकाळी ठिक ८-१५ च्या सुमारास वशेणी गावातील रहिवाशी असणारा तरुण कामगार संदिप पाटील हा आपल्या मोटारसायकल वरून नेहमी प्रमाणे द्रोणागिरी नोड परिसरातील सि ब ड या खाजगी प्रकल्पात सेक्युटरी म्हणून कामावर जात असताना खोपटा पुला जवळ भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू अवजड ट्रेलरने धडक दिली.

accident1_1  H
 
या झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार संदिप पाटील या कामगारांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या कामगारांनी, तरुणांनी गर्दी करत संताप व्यक्त केला. या अपघाताची माहिती मिळताच उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संदिप पाटील या निष्पाप कामगार तरुणांच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच अपघाताला जबाबदार असणाऱ्या भरधाव वेगातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशी, नागरीक यांनी केली आहे.