उरण पंचायत समिती सभापतीपदी शेकापच्या समिधा म्हात्रे यांची निवड

21 Sep 2021 15:31:01
mam_1  H x W: 0
 
उरण | उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी शेकापच्या आवरे गणाच्या सदस्या समिधा निलेश म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सभापती समिधा म्हात्रे यांचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, माजी सभापती काशिनाथ पाटील, माजी सभापती ऍडद्रसागर कडू, उपसभापती शुभांगी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
 
उरण पंचायत समितीत आठ सदस्य संख्या असून यामध्ये शेकापचे पाच, शिवसेनेचे दोन आणि भाजपाचा एक सदस्य आहे. उरण पंचायत समितीचे सभापती ऍड. सागर कडू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या उरण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सोमवारी (दि. २०) निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एन एन गाडे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
 
यावेळी समिधा निलेश म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी उरणच्या सभापतीपदी समिधा म्हात्रे या निवडून आल्याचे घोषित केले. त्यांचे उपसभापती शुभांगी पाटील, उरण पंचायत समिती सदस्या वैशाली पाटील, दिक्षा पाटील, दिपक ठाकूर, हिराजी घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी सभापती काशिनाथ पाटील, शेकापच्या जेष्ठ नेत्या माधुरी गोसावी, शेकापचे चिटणीस मेघनाथ तांडेल, नगरसेविका प्रिती जॉर्ज म्हात्रे, जासई सरपंच संतोष घरत, युवा संघटना नेते रमाकांत पाटील, महेश म्हात्रे, चंद्रकांत पाटील, बाबूराव पालकर, संदिप गावंड, सुरेश पाटील,जीवन म्हात्रे, नरेंद्र मुंबईकर, महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत, त्यांना शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0