मुरुड : विहूर,चिकणी पूलाची तात्काळ दुरुस्ती करा; भाजपची मागणी

20 Sep 2021 12:34:07
murud_1  H x W:
 
कोर्लई | नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे साळाव-मुरुड रस्त्याची पार दुरवस्था झाली या रस्त्यावरील विहूर व चिकणी पूलाची तातडीने डागडुजी करण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्यावतीने तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना निवेदन दिले आहे.
 
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे मुरुड तालुक्यातील विहूर व चिकणी पूल एका बाजूने तुटले असून दुरवस्था झालेली आहे. पावसामुळे सदरचा रस्ता खचला असून पूलावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे तसेच मुरुड - साळाव रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. साईडपट्ट्या तुटल्या आहेत. यामुळे वाहनचालक व प्रवासीवर्गाला त्रास सहन करावा लागत असून मणक्याचे विकार होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
मुरुड-साळाव रस्त्याची दुरुस्ती व चिकणी-विहूर पूलाची तात्काळ डागडुजी करण्यात यावी, याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास नाईलाजाने भारतीय जनता पक्षातर्फे ५ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, असे भा.ज.पा.तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुरुड तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
 
यावेळी भारतीय जनता पक्षाचे मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष विनोद भगत, सरचिटणीस नरेश वारगे, संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, ज्ञानेश्वर डोलकर,नंदू मयेकर, जयेंद्र भणगे, महेश मानकर, अभिजित पानवलकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0