म्हसळ्यात अनंत चतुर्दशीच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप

By Raigad Times    19-Sep-2021
Total Views |
Ganpati Visarjan_1 &
 
म्हसळा । म्हसळा तालुक्यात आज अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांचे वाजतगाजत उत्साहात विर्सजन करण्यात आले. शहरातील एकूण 35 ते 40 गणपतींचे विसर्जन वाजत-गाजत, फटाकांच्या आतिषबाजीत, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विर्सजन करण्यात आले.
 
तालुक्यात बहुतांश गावातून खाडी, नदी, तळी, मोठ्या ओहोळाच्या पात्रात, ग्रामपंचायतीने बांधलेल्या विसर्जन घाटावर व विहिरीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. या विसर्जनादरम्यान म्हसळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.