पनवेल : घरफोडीत साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

By Raigad Times    16-Sep-2021
Total Views |
chori copy_1  H
 
पनवेल | घरफोडी करणार्‍या चोरटयानी अवघ्या तासाभरात पनवेलच्या कच्ची मोहल्ला परिसरातील अलओहद इमारतीतील दोन घरे फोडून त्यातील सुमारे 4 लाख 55 हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकिस आली आहे.
 
पनवेलच्या कच्ची मोहल्ला परिसरात अलओहद बिल्डींग मध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे समिर बारगीर पत्नी व मुलासह घरगुती सामानाच्या खरेदीसाठी गेले होते. यादरम्यान, त्यांचे घर बंद असल्याने चोरटयांनी संधी साधुन त्यांच्या घराचा कडी कोयंडा व टाळे तोडून त्यांच्या घरातील 4 लाख 45 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. त्याचप्रमाणे या चोरटयानी दुसर्‍या मजल्यावरील इम्रान इक्बाल शेख यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील 8 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले.
 
chori 1_1  H x
 
दरम्यान काही तासानंतर समिर बारगीर यांच्या घराचा कडी कोयंडा तुटल्याचे शेजार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी समीर बारगीर यांना याबाबत फोन करुन माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घरी धाव घेऊन पहाणी केली असता, त्यांच्या घरात तसेच दुसर्‍या मजल्यावरील घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.