माणुसकी प्रतिष्ठानचा ‘निर्मल गणेशोत्सव’; विसर्जनासाठी तयार केले कृत्रिम तलाव

By Raigad Times    14-Sep-2021
Total Views |
Nirmal Ganeshotsav_1 
 
अलिबाग । रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सर्व गणपती मंडळांसह खासगी गणपती स्थापना करणार्‍या गणेशभक्तांना निर्मल गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, माणुसकी प्रतिष्ठानने कृत्रिम तलावाची निर्मिती करत, निर्मल गणेशोत्सवात हातभार लावला.
 
माणुसकी कार्यालय येथे गणपती विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव तयार करुन दीड दिवसाच्या व पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या कृत्रिम तलावात करण्याकरिता माणुसकी प्रतिष्ठानतर्फे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साद देत डॉ.सिद्धार्थ कुलकर्णी व माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी दीड दिवसाच्या गणपतीचे तर सरस हॉस्पिटल जीतनगर, माणुसकी प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष तानाजी आगलावे यांनी 5 दिवसांच्या बाप्पाचे या कृत्रिम तलावात विजर्सन करत, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला.

Nirmal Ganeshotsav_1 
 
यावेळी डॉ.राजाराम हुलवान यांनी निर्मल गणेशोत्सवाबाबत तसेच आरोग्याप्रती चांगल्या सवयी लावून गावापतळीवर जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन निर्मल पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती केली.
 
यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सतीश कणसे, खजिनदार संतोष कणसे, महिला सदस्या भावना आगलावे, आगलावे कुटुंबातील सर्व सदस्य, पूनम कवळे, संजय काळेल, मंगेश म्हात्रे, सुधाकर निषाद, आप्पा मोटे, शंकर मेटकरी, सुधीर मेटकरी, अमृत म्हात्रे, सुमित राऊळ, दिवाकर निषाद, बंदेनवाब यांच्यासह माणुसकीची टीम तसेच इतर ग्रामस्थ हजर होते.