रायगडात आज कोरोनाचे 87 नवे रुग्ण; 9 मृत्यू

दिवसभरात 103 रुग्णांची कोरोनावर मात

By Raigad Times    14-Sep-2021
Total Views |
Raigad Corona Report_1&nb
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज (14 सप्टेंबर) कोरोनाच्या 87 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 103 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आज पनवेल शहरात 35, पनवेल ग्रामीणमध्ये 15, अलिबागमध्ये 19, खालापूरमध्ये 5, उरणमध्ये 3, कर्जतमध्ये 1, पेणमध्ये 7, माणगावमध्ये 2 रुग्णांची नोंद झाली आहे. तर तळा, श्रीवर्धन, सुधागड, महाड, रोहा, मुरुड, म्हसळा आणि पोलादपूर या 8 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
 
आजअखेर रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 66 हजार 469 झाली आहे. यापैकी 1 लाख 61 हजार 1 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 278 वर गेला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 190 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (14 सप्टेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Raigad Corona Report_1&nb