रोह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापा टाकून कारवाई; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

रायगड व ठाणे राज्य उत्पादन शुल्कची संयुक्त कारवाई

By Raigad Times    13-Sep-2021
Total Views |
illegal liquor_1 &nb
अलिबाग । रोहा तालुक्यातील गोपाळवठ धनगरवाडी, कारवीने धनगरवाडी व कारवीने ठाकूरवाडी येथील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर रायगड व ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 2 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार कोकण विभाग ठाण्याचे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक किर्ती शेडगे, ठाणे उपअधीक्षक चारुदत्त हांडे यांच्या नेतृत्वाखाली 11 व 12 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
 
या धाडीदरम्यान एकूण सहा गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी एक वारस तर 5 बेवारस गुन्हे असून एकाला ताब्यात घेतले आहे. तसेच 80 लिटर हातभट्टी दारू आणि सात हजार 400 लिटर रसायनही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या मुरुड विभागाचे निरीक्षक आनंद अं.पवार यांनी दिली आहे.