अल्पवयीन मुलीला कर्जतमधून पळवले; तक्रारीनंतर शोध सुरु

30 Aug 2021 18:14:45
girl_1  H x W:
 
कर्जत | कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञाताने फुस लावून पळवून नेले असल्याची घटना घडली आहे, मुलीच्या पालकांनी तशी तक्रार दाखल केल्यानंतर त्या इसमाचा पोलीस शोध घेत आहेत.
 
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत २८ ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील वदप येथील संजयनगर येथून एक अल्पवयीन मुलगी घरातून काहीएक न सांगता निघुन गेली ती घरी परत आलीच नाही. तेव्हा आपली मुलगी गायब झाली आहे खात्री पटल्यानंतर तिच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. आपल्या मुलीला कोणीतरी ती अल्पवयीन आहे हे माहीत असूनदेखील तिला फूस लावून पळवून नेली असल्याचा संशय व्यक्त केला.
 
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२३०/२०२१ भा.दं.वि.क.३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे हे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0