अलिबाग : हाशिवरे येथील निवृत्त शिक्षक गजानन पाटील यांचे निधन

By Raigad Times    28-Aug-2021
Total Views |
passes away_1   
 
अलिबाग । तालुक्यातील हाशिवरे येथील बहुआयामी निवृत्त शिक्षक गजानन महादेव पाटील यांचे वयाच्या 78 व्या वर्षी हृदय विकाराच्या आजाराने मंगळवारी (24 ऑगस्ट) दुपारी तीन वाजता नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात निधन झाले. ते व्यवसायाने शिक्षक होते.
 
रायगड जिल्ह्यात त्यांनी माणगाव, पेण, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये ज्ञानदानाचे उत्तम कार्य केले आहे. गजानन पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक उत्कृष्ट कामाबद्दल रायगड जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे 2003 साली ते श्रीवर्धन तालुक्यातून सेवानिवृत्त झाले.
 
गजानन पाटील यांना अध्यात्माची फार आवड होती. महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे समाज प्रबोधनाचे काम गेली 75 वर्षे चालू आहे. त्यात ते मोठ्या आनंदाने सहभागी झाले. इतर सामाजिक संस्थांबरोबरदेखील त्यांचे निकटचे संबंध होते. त्यांची चारही मुले उच्चविद्याविभूषित असून आपले काम व्यक्तीगतरित्या करीत आहेत.
 
त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, एक भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांना तुर्भे येथील स्मशानभूमीत त्यांचे ज्येष्ठ पुत्र संदेश पाटील व संदीप पाटील यांनी अग्नी दिला.