रायगड : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दरडग्रस्त भागाची केली पाहणी

By Raigad Times    25-Aug-2021
Total Views |
Raigad Collector Mahendra
 
अलिबाग । रायगड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे मंगळवारी होती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दुसर्‍याच दिवशी बुधवारी (25 ऑगस्ट) महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूर आणि दरडग्रस्त भागाची पाहणी केली.
 
या पाहणीदरम्यान त्यांनी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या व यापुढे करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. येथील नागरिकांना शासकीय सोयी-सुविधा देण्याबाबत अश्वस्तही केले.

Raigad Collector Mahendra
 
यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसीलदार सुरेश काशिद, पोलादपूर प्र.तहसीलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी वृषाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी गुलाबराव सोनवणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.