तळा येथे गोहत्या प्रकरणी १२ जण अटकेत

By Raigad Times    14-Aug-2021
Total Views |
sir news 1_1  H
 
एका अल्पवयीन मुलाचाही समावेश
 
तळा | विराज टिळक | तालुक्यातील एका फार्महाऊसवर गोहत्या करणार्‍या १२ जणांना तळा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या घटनेनंतर आज दुपारी दोन वाजल्यापासून तळा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
 
तळा तालुक्यातील कळमशेत गावच्या हद्दीत अब्दुरम मुल्ला याच्या फार्महाऊसवर गुरांच्या गोठ्यात शुक्रवारी (१३
ऑगस्ट) गोहत्या करण्यात आल्याची माहिती तळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याठिकाणी गोहत्या झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
 
त्यांनी याप्रकरणी असीम अब्दुरम मुल्ला, सउद जावेद करदेकर, परवेज अजीज कडू, असिफ जलील फटाकरे, मोहिन मुदाद मियॉं, रिझवान रफिक टोळकर, परवेझ महमदखान पठाण, महमद हनिफ सत्तार गोलंदाज, शाकीब सलाम अरब, मनान बशीर फटाकरे, माजिद उमर गोठेकर यांच्यासह एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण वरचा मोहल्ला येथील राहणारे आहेत.
 
त्यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय शिवराज खराडे हे करीत आहेत.