गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
अलिबाग । दरड पडून उद्ध्वस्त झालेल्या महाड तालुक्यातील तळीये गावाची जबाबदारी म्हाडाने घेतली असून, हे पूर्ण गाव नव्याने वसविणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
तळीये गावावर गुरुवारी रात्री दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. घरंच्या घरं दरडीखाली दबली जाऊन निष्पांपाचे जीव गेले. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तळीयेमध्ये आता फक्त उद्ध्वस्त झालेले संसार, चिखल, मृत्यूचा तांडव, आक्रोश सुरु आहे.
दरडीमध्ये उद्ध्वस्त झालेले तळीये हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणालाही अडचण भासू देणार नाही, असा शब्द दिला आहे. तो पूर्ण करायला सुरुवात केली असल्याचे ना.जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.