रायगड : मोर्बा गावच्या पुढे दरड कोसळली

By Raigad Times    19-Jul-2021
Total Views |
Dighi-Mangaon Road_1 
 
अलिबाग : माणगाव-दिघी रस्त्यावरील मोर्बा गावच्या पुढे दरड कोसळली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला आहे. याठिकाणी दरड हटविण्याचे काम चालू असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे.
 
माणगाव-दिघी रस्त्यावर कुडगाव येथेही दरड कोसळली आहे. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. याठिकाणीही दरड हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी काम सुरु आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराची माती सैल होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
 
बाळगंगा तुडूंब; मुंबई-गोवा महामार्गावरुन पाणी
 
मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यांतील जिते गावच्या हद्दीत बाळगंगा नदी तुडूंब भरून वाहत असल्याने महामार्गावरुनही पाणी जात आहे.
अंबा नदीचे पाणी रस्त्यावर; कुहिरेजवळ रस्ता बंद

Dighi-Mangaon Road_1  
नागोठणे एस. टी. स्टँड व नागोठणे कोळीवाडा परिसरात येथील अंबा नदीचे पाणी आले आहे. तसेच नागोठणे ते पोयनाड रोडवरील कुहिरे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 
आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे :
अलिबाग- 123.00 मि.मी., पेण- 180.00 मि.मी., मुरुड- 270.00 मि.मी., पनवेल- 284.20 मि.मी., उरण-151.00 मि.मी., कर्जत- 194.60 मि.मी., खालापूर- 195.00 मि.मी., माणगाव- 207.00 मि.मी., रोहा- 202.00 मि.मी., सुधागड-166.00 मि.मी., तळा- 210.00 मि.मी., महाड- 89.00 मि.मी., पोलादपूर- 122.00 मि.मी, म्हसळा- 159.00 मि.मी., श्रीवर्धन- 163.00 मि.मी., माथेरान- 268.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 2 हजार 984.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 186.51 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 59.51 टक्के इतकी आहे.