गावाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी सहकार्य करा; आ.अनिकेत तटकरे यांचे आवाहन

By Raigad Times    17-Jul-2021
Total Views |
Shrivardhan_Vadvali Villa 
 
वडवलीसाठी दोन घंटागाड्यांचे लोकार्पण
 
बोर्लीपंचतन । गावातील आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्व नागरिकांनी जबाबदार घटक म्हणून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.
 
खासदार सुनील तटकरे यांनी आदर्श सांसद ग्राम योजनेतून दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून दोन घंटाघाडी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या घंटागाड्यांचे लोकार्पण आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते आज (17 जुलै) वडवली ग्रामपंचायत प्रांगणामध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 
याप्रसंगी राष्ट्रवादीचे विधानसभा मतदार संघ अध्यक्ष महंमद मेमन, श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष सुचिन किर, संघटक नंदू पाटील, सरपंच प्रियांका नाक्ती, उपसरपंच दिपक कांबळे, सदस्य गणेश नाक्ती, सुरेश धुमाळ, नितीन मांजरेकर, मनीषा कांबळे, मनीषा नाकती, शहनाझ वेळासकर, आगरी समाज अध्यक्ष विकास नाक्ती, भंडारी समाज अध्यक्ष कृष्णकांत पिळणकर, मुस्लिम समाज अध्यक्ष रिझवान वेळासकर, सदानंद खेउर, हरेश्वर सरपंच अमित खोत, ग्रामविकास अधिकारी प्रज्योत सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमाण तसेच इतर उपस्थित होते.

Shrivardhan_Vadvali Villa 
 
आ. अनिकेत तटकरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, वडवली हे गाव खासदार सुनील तटकरे यांनी दत्तक घेतल्यानंतर कोरोनामुळे निधीची उपलब्धता करण्यास विलंब होत आहे, ही वस्तूस्थिती आहे. परंतु काम करण्याचे प्रामाणिक प्रयत्न असल्याने पुढील कालावधीमध्ये विकासकामे होत राहतील आणि दिलेले शब्द पूर्णत्वास कसे जातील. नागरिकांमध्ये जागरूकता आणून गावामध्ये स्वच्छता नांदेल, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
ते पुढे म्हणाले की, कचरा व्यवस्थापन करताना वडवलीसोबत शिस्ते व बोर्लीपंचतनसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींनी नियोजन करुन एक डंम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करावी व त्या कचर्‍याचे सुयोग्य व्यवस्थापन करावे, अशा सूचनाही आ. अनिकेत तटकरे यांनी केल्या.
----------------------------
वडवली गावामध्ये सध्या सीएसआर फंडातून सुरु असलेले शाळेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत सोशल मीडियातून याबाबत टीका होत आहे. त्यावर आमदार अनिकेत तटकरे यांनी शाळेचे बांधकाम करणार्‍या ठेकेदाराला यातून सूचना वजा तंबी दिली की, शाळेचे काम पुण्याईचे काम असल्याने ठेकेदाराने काम करताना काम चांगल्या प्रकारे करावे. जेणेकरुन हे बांधकाम चिरकाल टिकेल.