पनवेल परिसरातून चार मोटारसायकल चोरीला

By Raigad Times    10-Jul-2021
Total Views |
Theft_Crime News_Bike The
 
वाहनचोरीच्या वाढलेल्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान
 
पनवेल । पनवेल परिसरातून चार मोटारसायकलींची चोरी झाली आहे. यापैकी तीन मोटारसायकली तळोजा परिसरातून तर एक कामोठे परिसरातून चोरीस गेल्या आहेत.
 
गंगाधर शेट्टी यांची 30 हजारांची हिरो ग्लॅमर कंपनीची काळ्या व निळ्या रंगाची मोटारसायकल क्र.एमएच 46 बीजे 3074 ही देवीचा पाडा पूनम कलेक्शन दुकानाजवळ उभी करून ठेवली होती. मात्र ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
 
विकास कांबळे यांची होडा सीबी शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्र. एमएच 04 जेएल 9514 तळोजा औद्योगिक वसाहत डाऊ केमिकल कंपनी येथे उभी केली असता तिची चोरी झाली आहे. या गाडीची किंमत 15 हजारांची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 
तर सचिन हुंबे यांची 50 हजारांची यामाहा कंपनीची एफझेड ग्रे रंगाची मोटारसायकल क्र.एमएच 46 बीजे 5146 बाळकृष्ण यांची चाळ देवीचा पाडा येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
 
तर विभोर देठे यांची 45 हजारांची होंडा कंपनीची अ‍ॅक्टीव्हा 3जी ग्रे रंगाची एमएच 46 एएन 5834 क्रमांकाची मोटारसायकल एमजीएम हॉस्पिटल येथील पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता चोरीला गेल्याची कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
 
दरम्यान, वाहनचोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून, पोलिसांसमोर वाहनचोरांनी आव्हान उभे केले आहे.