अतिवृष्टीचा इशारा! रायगडातील सर्व दुकाने दोन दिवस बंद राहणार

09 Jun 2021 21:48:15
Heavyrain warning_Raigad_
 
  • अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई
  • जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश
 अलिबाग । रायगड जिल्ह्यात 10 व 11 जून हे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
 
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अतिवृष्टीच्या कालावधीत होणारी जीवित व आर्थिक हानी टाळण्यासाठी 10 जून व 11 जूनला सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. फक्त दवाखाने, रुग्णालय, मेडिकल, पॅथॉलॉजी सुरु राहतील. तसेच सर्व शासकीय कार्यालयेही या कालावधीत सुरु राहतील, असे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात म्हटले आहे.
 
सविस्तर आदेश खालीलप्रमाणे :
Heavyrain warning_Raigad_
Heavyrain warning_Raigad_ 
Powered By Sangraha 9.0