जिल्हा परिषदेत आरटीपीसीआर तपासणी शिबिर

By Raigad Times    08-Jun-2021
Total Views |
 WhatsApp Image 2021-06-08
 
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मंगळवारी (ता.८) आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी आरटीपीसीआरचे १९७ नमुने पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तर सर्दी, खोकला, ताप अशी कोरोना सदृश लक्षणे असणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांची अँन्टीजन चाचणी करण्यात आली असून, त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून हे तपासणी शिबीर पार पडले.

सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात अॅंटीजन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. यासाठी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.

WhatsApp Image 2021-06-08 
जिल्हा परिषद कार्यालयात आरटीपीसीआर चाचणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात जिल्हा परिषदेतील विविध ११ खात्यांमधील १९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ शिल्पा बलगम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्र्वेताली नाईक, श्वेता गावंड, डाटा एंट्री ऑपरेटर तृप्ती करकरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नमुने घेतले.