कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा पिकअप टेम्पो पकडला

By Raigad Times    08-Jun-2021
Total Views |
 Cow_1  H x W: 0
 
माणगाव पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल
 
माणगाव । माणगावपासून 5 किमी अंतरावर असणार्‍या मोर्बा गावच्या हद्दीत गुरांना क्रूरतेने डांबून ठेवून कत्तलीसाठी त्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पकडला आहे. माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आज (8 जून) पहाटे 1.20 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई धोंडिबा गीते यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम कुरेशी (वय 37, रा.मोर्बा ता.माणगाव) हा त्याच्या ताब्यातील एमएच-03/2112 या क्रमांकाच्या पिकअप वाहनात चार गाई व एक वासरु (खोंड) क्रूरतेने डांबून ठेवून कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांचीेवाहतूक करताना सापडला.
 
याप्रकरणी त्याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5(ए), (बी) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (इ), (एफ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.