मुरुड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कडक कारवाई

02 Jun 2021 11:16:41
murud news_1  H 
 
  • कोर्लई, निडी गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित
  • राजपुरी व एकदरा गावात स्क्रिनिंग तपासणी
  • कोरोना हद्दपार करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक-तहसीलदार गमन गावित
कोर्लई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले असून लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. दुसर्‍या लाटेचा प्रभाव मुरुड तालुक्यातही दिसून येत असून रुग्णसंख्या लक्षात घेऊन तालुक्यातील कोर्लई, निडी गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. तर राजपुरी व एकदरा गावात स्क्रिनिंग तपासणी केल्याची माहिती तहसीलदार गमन गावित यांनी दिली आहे. तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.

murud news 2_1   
 
मुरुड तालुक्यातील कोर्लई, निडी व राजपुरी भागात तहसीलदार गमन गावित यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच उपाययोजना म्हणून कोर्लई, निडी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. राजपुरी व एकदरा गावात रुग्णसंख्या वाढत असल्याच्या तक्रारीवरून दोन्ही गावांची स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली आहे. तालुक्यात अन्यत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसमितीने दक्षता घ्यावी व जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
 
लग्न कार्यात कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले असल्याने लोकांनी हळदीचा कार्यक्रम रद्द करावा, तसेच तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, कोरोना हद्दपार करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार गमन गावित यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0