सुधागडात 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

By Raigad Times    13-Jun-2021
Total Views |
Suicide_Sudhagad Taluka_1
 
कमरेच्या पट्ट्याने लावून घेतला गळफास
 
पाली/बेणसे । सुधागड तालुक्यातील वाकणवाडी आदिवासी वाडीतील एका तरुणाने आज (13 जून) गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
 
पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटू सागर जाधव (25, रा.वाकण आदिवासी वाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पिंटू आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शौचालयास जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता, त्याने घराजवळील जंगलभागात सागाच्या झाडाला कमरेच्या पट्ट्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.
 
पिंटू जाधव याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पाटील करीत आहेत.