लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By Raigad Times    12-Jun-2021
Total Views |
Rape_Minor girl Rape_Pen_
 
पेण शहरातील घटना; तरुण अटकेत
 
पेण । अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना पेण शहरात उघडकीस आली आहे. पीडित मुलगी 5 महिन्यांची गरोदर असून, याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला पेण पोलिसांनी अटक केली आहे.
 
पेण शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बाटेवाडा-नंदीमाळ नाका येथे राहणार्‍या 19 वर्षीय तरुणाने तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. 1 डिसेंबर 2020 ते 8 जून 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. पीडित मुलगी 5 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही घटना समोर आली.
 
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पेण पोलिसांनी सदर तरुणाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे. 
 
या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मीनल शिंदे करत आहेत.