सुधागड तालुक्यात आज कोरोनाचे 10 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू

12 Jun 2021 19:25:50
Corona_Sudhagad Corona Ne
 
पाली/वाघोशी । सुधागड तालुक्यात आज (12 जून) कोरोनाच्या 10 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे.
 
सुधागड तालुक्यात आजअखेर कोरोनाच्या 1 हजार 233 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 1 हजार 83 रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात 92 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.
 
दरम्यान, नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी. घाबरुन जाऊ नये, असे आवाहन डॉ. शशिकांत मढवी यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0