कर्जत तालुक्यातील धरण, धबधब्यांवर जाण्यास बंदी

By Raigad Times    10-Jun-2021
Total Views |
 karjet news of dhabdhaba_
 
प्रांताधिकार्‍यांकडून आदेश जारी; पोलीस करणार कारवाई
 
कर्जत । पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक हे धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येत असून जीवितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच यावर्षी धबधबा, धरण, पाणवठे आणि तलाव या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये, याकरिता हे प्रतिबंधात्मक (कलम 144) आदेश प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी पारित केले आहेत.

karjet news 2_1 &nbs 
 
कर्जत उपविभागात येणार्‍या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण 23 ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असतील. सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाण्याच्या प्रवाहात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
कर्जत तालुक्यातील आषाणे-कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण, पळसदरी धरण, कोंढाणे धरण आणि धबधबा, पाली भुतीवली धरण, नेरळ जुमापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधब्यावर जाण्यास बंदी आहे.
 
खालापूर तालुक्यातील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा व परिसर, आडोशी तलाव, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, मोरबे डॅम, नढाळ-वरोसे धरण, वावर्ले धरण, माडप धबधबा, धामणी धबधबा, कलोते आणि सर्व पाठवठे आणि धरणावर जाण्यास बंदी आहे.

karjet news3_1   
 
...असे असणार प्रतिबंध
 
पावसामुळे निर्माण झालेले धबधबे परिसरात मद्य करण्यास व विक्री करणे आणि मद्यधुंद अवस्थेत असणे, सेल्फी अगर चित्रीकरण करणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणं, वाहन वेगाने चालवणे, वाहतुकीस अडथळा आणण किंवा धोकादायक स्थितीत वाहने चालवणे आणि त्यांना ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी केरकचरा करणे, महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, असभ्य वर्तन आणि अश्लील हावभाव करणं, लज्जा निर्माण होईल असं कोणतंही कृत्य सार्वजनिक ठिकाणी डीजे मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, जल, वायू, ध्वनी प्रदूषण करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असल्याने सोशल डिस्टन्सिंग पालन होणे आवश्यक आहे.