अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 99 नवे रुग्ण

By Raigad Times    10-Jun-2021
Total Views |
Alibag Corona Report_toda
 
  • सलग दुसर्‍या दिवशी 6 मृत्यूंची नोंद
  • दिवसभरात 56 रुग्णांची कोरोनावर मात
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (10 जून) कोरोनाच्या 99 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 56 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
तालुक्यात काल (9 जून) 6 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर आज सलग दुसर्‍या दिवशी 6 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आजअखेर तालुक्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांंची संख्या 416 झाली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 364 झाली आहे. यापैकी 416 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 12 हजार 740 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 208 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (10 जून) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

Alibag Corona Report_toda
Alibag Corona Report_toda
Alibag Corona Report_toda
Alibag Corona Report_toda
Alibag Corona Report_toda