दिवसभरात 546 रुग्णांची कोरोनावर मात
अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज (10 जून) कोरोनाच्या 561 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 546 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
आज पनवेल शहरात 84, पनवेल ग्रामीणमध्ये 50, अलिबाग तालुक्यात 99, खालापूरमध्ये 30, उरणमध्ये 13, पेणमध्ये 59, महाडमध्ये 49, कर्जतमध्ये 14, रोह्यात 56, मुरुडमध्ये 32, माणगावमध्ये 38, तळामध्ये 5, म्हसळ्यात 8, सुधागडमध्ये 4, पोलादपूरमध्ये 3, श्रीवर्धनमध्ये 17 रुग्णांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे.
आजअखेर रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 630 झाली आहे. यापैकी 1 लाख 26 हजार 966 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 291 वर गेला आहे. सद्यस्थितीत 6 हजार 373 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
आज (10 जून) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :