म्हसळा शहरात 5 धोकादायक इमारती सिल

10 Jun 2021 13:59:14
 mhasala news_1  
 
मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांची कारवाई
म्हसळा । भारतीय हवामान खात्याने दिनांक 9 जुन ते 12 जुन 2021 या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी मा.जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग कार्यालयाद्वारे धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले असता त्या अनुषंगाने म्हसळा नगर पंचायत हद्दीतील बाजारपेठ परिसरातील 3 आणि सोनारआळीतील 2 अशा 5 इमारती म्हसळा नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने सिल केल्या आहेत.
 
कारवाई बाबत सविस्तरपणे माहिती घेतली असता म्हसळा नगर पंचायत हद्दीतील तालुका शहरात एकुण 11 इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने कोणतीही आपत्कालीन घटना घडु नये,कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होऊ नये या करिता इमारतीच्या संबंधित मालकांना दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम करण्यासाठी नगर पंचायती मार्फत आगाऊ नोटीस देण्यात आली होती.तसेच सदर इमारतींच्या मलकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता असे म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी माहिती देताना सांगितले.

mhasala news 2_1 &nb 
 
नादुरुस्त 11 इमारतींपैकी 3 इमारत मालकांनी स्वतःहुन पाडल्या आहेत तर 3 इमारतीमध्ये कोणीही वास्तव्यास नसुन उर्वरित 5 इमारतीना दिनांक 9 जुन रोजी जिल्हा प्रशासनाचे आदेशा नुसार म्हसळा पोलिसांचे मदतीने सील करण्यात आल्या आहेत. वारंवार सूचना देउनही सदर इमारतीच्या मालकांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून त्यातील 5 इमारती सील करणेत आल्या असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगताना सदर ठिकाणी नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.

mhasala news3_1 &nbs 
 
सील करण्यात आलेल्या 4 इमारतीमध्ये व्यवसाय व एका इमारतीत गोडाऊन असल्याचे समजते.सिल करण्यात आलेल्या इमारती 1) अ.लतीफ अब्बास मुंगये इमारत क्रमांक 554,2)रामनाथ अनंत तळकर उर्फ वेदक 282,3)बद्दनिसा खैरुद्दीन लोगडे 1085,4)अ.शकुर अ. रहमान उकये 538,5)अ.फैसल युसुफ राऊत134 ह्या पाच इमारती धोकादायक असल्याने त्या अतिवृष्टीमुळे सील करण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले आहे.संबंधीतांनी सदर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (ीींरलळश्रळीूं लशीींळषळलरींश)सादर केल्यास तत्काळ सील काढले जाईल असेही माहिती देताना सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0