कर्जत : एनडी स्टुडिओत आग

07 May 2021 14:08:57
N D Studio_1  H
 
  • आग विझविण्याचे प्रयत्न सुरु
  • ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर सेटला लागली आग
कर्जत। खालापूर तालुक्यातील हातणोली-चौक येथील प्रसिद्ध एन.डी. स्टुडिओत आज दुपारी आग लागली आहे. ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली असून, आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 
आज (7 मे) दुपारी बारा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. ही आग प्रचंड असून, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ या परिसरात पहायला मिळत आहेत. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली आहे.
 
N D Studio_1  H
 
घटनास्थळी खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार, पोलीस निरीक्षक विभूते व संबंधित यंत्रणा दाखल झाले असून, फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या बोलाविल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ND studio_1  H  
 
दरम्यान, या आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही.
Powered By Sangraha 9.0